सोलापूर – बचत गटाच्या महिला ज्या जिद्दीने काम करतात. ते कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील बचतगटांना ३७ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. १०० कोटीचे कर्ज वाटप करणेत येणार आहे. बचतगटांनी ग्रामीण सुविधा केंद्र निर्माण करा. १६६ कोटी रूपये कर्ज बचतगटांना वाटप करायचे आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये सहभागी व्हा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. सांगोला पंचायत समिती च्या वतीने उमेद अंतर्गत सुविधा केंद्राचा शुभारंभ सांगोला येथे करणेत आला.
शहरातील बचतभवन येथे आयोजित कार्यक्रमात त्ते बोलत होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, प्रकल्प संचालक स्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, सभापती राणी कोळवले, उप सभापती जगताप, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उमेद अभियान व्यवस्थापक गंगा मडवळी, प्रमुख उपस्थित होते.
सिईओ दिलीप स्वामी पुढे म्हणाले , काम करताना अडचणी येतात. सावित्री बाई फुले, संत गाडगे बाबा यांना देखील काम करताना त्रास झाला आहे. काम करताना अडचणी येतात. जिल्ह्यातील बचतगटांना ३७ कोटी रूपये क्रेट वाटप केले आहे. बॅंकाना बचतगटांना कर्ज देणे बंधनकारक आहे. सांगोला तालुक्यांतील सर्व गटांनी शंभर टक्के कर्ज वसुली केली आहे. ताकदीने काम करा. शौषखड्डे साठी लागणारे साहित्या साठी ग्रामीण सुविधा केंद्र निर्माण करा.गरज पाहून कर्ज वाटप व वस्तुची निर्मिती करा.बचतगटाचे साहित्य भेट म्हणून द्या. बचतगटाच्या उत्पादनांना वाव द्या. आपली उमेद कायम ठेवा. जगण्याची, काम करणेची उमेद बाळगायची आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ मध्ये सहभागी व्हा. अॅप वर प्रतिक्रिया नोंदवा
उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी महिला प्रभाग संघाचे काम उत्कृष्ठ आहे. ३० लाख रूपयांची बचत व आॅडीट महत्वपुर्ण आहे. बचत गटांनी स्वच्छतेच्या विविध उपक्रमांत सहभागी व्हा.
प्रकल्प संचालक स्मिता पाटील यांनी जे बचत गटाचे सदस्यांनी रोजगार हमी योजनेतून शौषखड्डे घ्यावेत.स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ अंतर्गत ssg2021 अॅप डाऊनलोड करून प्रतिसाद द्या. असे आवाहन केले. या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मघ्ये सहभागी व्हा असे आवाहन केले.
अभियान व्यवस्थापक मडिवाळ यांनी प्रास्ताविक केले.
महुदच्या कामांना गती द्या – सिओ स्वामी
माझी वसुंधरा व स्वच्छ भारत मिशन मध्ये समाविष्ट असलेल्सा महुद ग्रामपंचायती मघ्ये नाविन्य पुर्ण उपक्रम राबवा. दोन लाख तुळशीची रोपे, रोजगार हमी योजनेतून शौषखड्डे घ्या. २ आॅक्टोबर ते ३० आॅक्टोबर या कालावधीत कामे पुर्ण करा. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन चा डीपीआर दि. ५ आॅक्टोबर पर्यंत करणेचे सुचना दिल्या. महुद हे कासाळगंगा सारखा प्रकल्प राबवून एकत्रीत आलेले गाव आहे. लोक एकत्र येत नाहीत. जे एकत्र आले आहेत त्यांना सहकार्य करा. वेळेत कामे पुर्ण करा. शाळा सौदर्यीकरण कामात महुद च्या शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
सांगोला तालुका सर्व कामांवर सिईओ नाराज…!
सांगोला तालु्क्यातील रोहयो, शाळा सौदर्यीकरण, घरकुल , नळजोडणी, या कामांवर सिईओ दिलीप स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली. कुठल्या कामात आघाडीवर आहात ते सांगा असा प्रश्न करू. कामात सुधारणा झाली नाही तर प्रशासकीय कारवाई करावी लागेल. मी कुणाचे ऐकोन घेणार नाही. असेही त्यांनी सांगितले.
