स्वराज्य प्रेरीका राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वराज्य संकल्प शहाजी राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतुन व सर्वानुमते १६ जानेवारी १६८१ रोजी स्वराज्याचे पहिले युवराज संभाजी महाराज यांना रयतेने छत्रपती बनवले. तोच हा आजचा दिवस होय. हा सोहळा सोलापूर जिल्हयात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषक सोहळा समिती दरसाला प्रमाणे आयोजित करणे, यावर्षी समितीचे आठवे वर्षे आहे. या निमित्ताने समिती तर्फे शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसराची सजावट केली होती.
सकाळी ठिक ९.०० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करुन ध्वजपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर संभाजी महाराजांच्या १३ फुटी पुतळयास खास दक्षिणात्य पध्दतीचा ९ फुटी हार, घालुन समिती तर्फे मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रमुख अतिथी यावेळी असे गुरुवर्य ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे राष्ट्रीय अध्यक्ष अ.भ. वारकरी सं.मंडळ जे आपल्या किर्तनातुन लोकजागृती, लोक प्रबोधन करतात यांना यावर्षी राज्याभिषेक करण्याचा मान देवून समितीने भक्ती व शक्ती याचे संगम करुन आपली वेगळी कला जपली. तसेच राज्याभिषेक करणा-या मान्यवरांचा समिती तर्फे शिवश्री सन्मान पुरस्कार, शाल, श्रीफळ, फेटा बांधुन यथोचित सत्कार करण्यात आला. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व शिवशंभो मावळयांना आनंदोत्सव म्हणून समितीच्या वतीन मिठाईचे वाटप करण्यात आले.
त्याच बरोबर छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळयाचे निमित्त साधन दरसालाप्रमाणे समितीच्या वतीने रक्तदानाचे आयोजन केले होते. स्वेच्छेने रक्तदान करणा-या रक्तदात्यांस समिती तर्फे छत्रपती संभाजी महाराज यांची मुर्ती भेट म्हणून देण्यात आली. बहुसंख्या शिवशंभो पाईकांनी यात रक्तदान केले.
यानंतर समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन कार्यक्रमाची समाप्ती सांगता केली. यात प्रामुख्याने कोणत्याही संघटनेचा किंवा राजकिय पक्षाचा सहभाग नव्हता. हा कार्यक्रम फक्त शिवशंभू पाईकांनीच आयोजित केला होता. याचे प्रमुख आयोजन शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती सोलापूर शहर जिल्हा हे होते. यातील प्रमुख सदस्य श्री शिरीष जगदाळे, अमोल जाधव, बाळासाहेब गायकवाड, संतोष आतकरे, संजोग सुरतगावकर, प्रकाश ननवरे, सचिन साळुंके, संजय पारवे, अजयसिंह सोमदळे, सोमनाथ राउत, सदाशिव पवार, परशुराम पवार, नितीन भोसले, श्रेयश माने, शेखर जगदाळे, श्रीनिवास सावंत व महाडिक सर, यादव सर, प्रशांत पाटील साहेब, गोवर्धन गुंड व शिवशंभु भक्त उपस्थित होते.