सोलापूर : राज्यसरकारने राज्य परिवहन महामंडळातील सन 2019 पासून प्रलंबित असलेल्या 336 एसटी कर्मचा-यांना एकाच महिन्यांत नियुक्त्या देऊन आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. सकल मराठा समाजच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रममुख अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख राजकुमार शिंदे, तुकाराम मस्के, माजी परिवहन सभापती राजन जाधव ,सकल मराठा समाजाचे माऊली पवार,गणेश डोंगरे,सचिन तिकटे मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील,विकास कदम, नागेश चव्हाण यांच्यासह नवनियुक्त उमेदवार यावेळी उपस्थित होते.
एसटी महामंडळात 2019 पासून कर्मचारी भरतीची प्रक्रिया रेंगाळली होती. ट्रेनिंगनंतरही सोलापूर विभागातील युवकांना तीन वेळा मेडिकल द्यावी लागली होती.या प्रश्नांवर सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते, तर माजी खा.छत्रपती संभाजीराजे यांनी या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या प्रश्न लावून धरला होता.त्यामुळं मराठासह इतर सर्वच समाजातील 336 जणांना चार टप्प्यात नियुक्त्या मिळाल्या आहेत. त्याचा जल्लोष आज सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला.यावेळी पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत, हालग्या लावून, फटाके फोडत, पेढे वाटून सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
चालक अन वाहक अश्या दोन्ही भूमिका बजावणार एसटीचे कर्मचारी !
विद्यमान शिंदे – फडणवीस सरकारने काळाची गरज ओळखून एसटीच्या कर्मचाऱ्यांना मल्टी टास्क ट्रेनिंग दिलंय.त्यामुळं नव्याने नियुक्त झालेले हे सर्व 336 कर्मचारी चालक आणि वाहक अश्या दोन्ही भूमिका पार पाडणार आहेत. त्यामुळं त्याचा अप्रत्यक्ष परिणाम एसटीच्या कार्यक्षमतेवर होणार असून उत्पन्नवाढीला चलना मिळणार आहे.