११४ कोरोनामुक्त; २६ पैकी १३ प्रभागात एकही नवीन रुग्ण नाही
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचा covid-19 चा २३ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून शहरात अवघे ३३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या व्यक्तींची संख्या ११४ आहे. या कालावधीत पाच जणांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . प्रभागनिहाय नवीन कोरोनाबधितांचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक १ ते ४ प्रभाग क्रमांक १२ ते १८ व प्रभाग क्रमांक ६ व १० अशा तेरा प्रभागांमध्ये नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही . प्रभाग क्रमांक ७, ११, १९ आणि २० या चार प्रभागांमध्ये प्रत्येकी केवळ एक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला आहे. शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे एक जून पासून प्रशासनाने संचारबंदी चे व जमावबंदी चे नियम आणखी शिथिल करावेत अशी मागणी नागरिकांमधून तसेच व्यापारी वर्गामधून होत आहे.