सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे येथे कार्यरत विलास हनुमंत ओहोळ व प्रविण कृष्णात घाडगे दोघे उपशिक्षक यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी निलंबित केले आहे. या दोन्ही उपशिक्षकांवर शाळेत वांरवार गैरहजर राहणे, वारंवार रजेवर व विनापरवाना गैरहजर राहून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान केल्याचे आरोप सिद्ध झाल्याने तसेच याबाबत खासदार, माढा यांनी १ सप्टेंबर २०२२ व २ सप्टेंबर २०२२ रोजीच्या आढावा बैठकीमध्ये गटशिक्षणाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी भेटी मध्ये दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करत नाहीत असे निदर्शनास आले होते.
9 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व गटविकास अधिकारी उत्तर सोलापूर यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे भेट दिली अचानक असता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी ता. उत्तर सोलापूर येथील कार्यरत मुख्याध्यापक बसवराज कोळी व उपशिक्षक सतीश राठोड हे सरपंच व समस्थ ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या समक्ष सदर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक हे शालेय कामकाजात वेळेवर उपस्थित राहत नाहीत, कामकाज नीट करीत नाहीत, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी व वरिष्ट अधिकारी यांनी वेळोवेळी भेटी मध्ये दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करत नाहीत असे निदर्शना आले होते.