नवी दिल्ली : देशात आत्तापर्यंत तांदळाची विक्रमी खरेदी झाली आहे. आणखी सरकारकडून तांदळाची खरेदी सुरुच आहे. देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत सरकारनं 306 लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत देशात 280.51 लाख टन तांदळाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी त्यामध्ये वाढ झाली आहे.
48 ते 72 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा
देशात सध्या मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी सुरु करण्यात आली आहे. तांदळाची वाहतूक करणारी वाहने विविध राज्यातील खरेदी केंद्र आणि मंडईसमोर उभी आहेत. देशातील बंपर धान खरेदीमुळे केंद्र सरकार समाधानी आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तांदळाचे पैसे 48 तासात तर 72 तासात शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहेत. केंद्र सरकार प्रत्येक राज्याची आकडेवारी घेऊन धान खरेदीचा तपशील गोळा करत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या खरेदी वाढली आहे. सध्या ज्या पद्धतीने तांदळाची खरेदी सुरू आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात त्यात आणखी झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता आहे.