येस न्युज मराठी नेटवर्क : श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथील अबूबकर दस्तगीर इनामदार यांच्या गाळा नंबर १ आणि गाळा नंबर २३ चे शटर उचकटून १० मे रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी २९,००० रुपये रोख आणि दोन लोखंडी कपाटे असा ३०,००० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार जेलरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस सबइन्स्पेक्टर लोंढे अधिक तपास करीत आहेत.