नान्नज ता. उत्तर सोलापूर येथे ३०० वर्षांपासून सुरू असलेली लालूबाईची यात्रा आनंदी उत्साहात पार पडल्याचे असल्याचे गोपाळ समाज बांधवांनी सांगितले. तर बीबीदारफळ ता.उत्तर सोलापूर येथे श्री सयाजी बाबा व श्री वंधारी माता गोपाळ, डोंबारी समाज बांधवांची यात्रा पार पडली आहे .
नान्नज येथे सुमारे तीनशे वर्षांपूर्वी लालूबाई ही २२ वर्षाची तरुणी गावोगावी तारेवरील कसरत कला सादर करत होती. त्यावेळी तिने कला सादर करण्याकरिता नान्नज हे गाव पसंत केले. गावात दोन महिने कला सादर केली. ती भाकरी न खाताफळांचे सेवन करत होती. तिसऱ्या महिन्यामध्ये तिने गावातील सर्वांना सांगितले, मी याच गावामध्ये माझा प्राण सोडणार आहे, नंतर माझी समाधी बांधून मंदिर उभा करून गोपाळ समाजाने याठिकाणी माझ्या नावाने यात्रा भरवावी, असे डोंबारी समाजातील वयोवृद्ध व्यक्ती आजही ही अख्यायिका आनंदाने सांगतात. तेव्हापासून आजपर्यंत दर तीन वर्षांनी नान्नज – बीबीदारफळ रस्त्याशेजारील लालूबाई परिसरात गुढी पाडव्यापासून मुख्य यात्रा भरवली जाते. या यात्रेच्या अगोदर एक महिना महाराष्ट्रासह सातारा, सोलापूर, बारामती, कर्नाटक राज्यातून, वेळापूर, अकलूज, व इतर ठिकाणावरील डोंबारी समाज ४ ते ५ हजाराच्या आसपास गोपाळ समाज उपस्थिती लावत असल्याचे सांगितले जात आहे. २० मार्च शुक्रवारी सकाळी लालूबाई समाधीला दुधाचा अभिषेक करत डोंबारी समाजातील भक्त व गावकऱ्यांकडून नवसाचे तोरण बांधणे, नैवद्य, नारळ हार,लक्ष्मी हार बांधणे कार्यक्रम, होमहवन आणि बळी देण्याची प्रथा व धार्मिक विधी परंपरा आजही जपली जाते.
यावेळी पुजारी अजय चव्हाण, संतोष चव्हाण, प्रवीण चव्हाण, विशाल चव्हाण, मिथुन चव्हाण, रमेश चव्हाण, सागर चव्हाण, विजय चव्हाण,वेदांत खांडके, प्रज्वल गवळी, तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
