वोट चोरी आंदोलनात नवी दिल्ली येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नवी दिल्ली – भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन देशात “वोट चोरी” करत असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली INDIA आघाडीचे सुमारे तीनशे खासदार, त्यात खासदार प्रणिती शिंदे यांचाही समावेश होता. संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी मोर्चा अडविला. खासदारांनी त्याठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केला यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह INDIA आघाडीचे खासदारांना पोलिसांनी सर्वांना मार्गातच अडवून ताब्यात घेतले असून आत्ता पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू आहे.“वोट चोर – गद्दी छोड” या घोषणांनी आज दिल्लीचे वातावरण दणाणून गेले होते. ही वोट चोरी देशाच्या लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे. पोलिसी बळाचा वापर करून करोडो मतदारांनी निवडून दिलेल्या जवळपास 300 खासदारांचा आवाज दाबला जात आहे, त्यांचे आंदोलन चिरडले जात आहे. तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल.
या देशातील नागरिकांनी आता ‘वोट चोर – गद्दी छोड’ म्हणायला सुरुवात केली आहे. आत्ता लोकशाही उरली नाही. मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाने लोकशाहीशी केलेला हा खेळ सहन केला जाणार नाही. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. वोट चोरी थांबवण्यासाठी आणि देशाची लोकशाही टिकवण्यासाठी लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देत जनतेने सुद्धा आत्ता या आंदोलनाला साथ द्यावी असे आवाहन केले.







