सोलापुर-तुळजापूर महामार्गावर तामलवाडीजवळ मंगळवारी सायंकाळी ३०० गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा स्फोट झाला. या सिलेंडरच्या स्फोटात ट्रक जळून खाक झाला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकमध्ये सुमारे ३०० सिलेंडर होते. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, घटनास्थळापासून जवळ असलेल्या घरांना हादरे बसले आणि घरातील भांडी पडली. यामुळे भीतीचे वातावरण पसरले. या घटनेमुळे सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद मार्गावरील वाहतूक मंगळवारी सायंकाळी जवळपास दोन ते अडीच तास खोळंबली होती.