येस न्युज मराठी नेटवर्क : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात कोरोना covid-19 या सांसर्गिक रोगाच्या अनुषंगाने शासकीय आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात सात मे रोजी केलेल्या कारवाईत २११० वाहनांची तपासणी केली. मास्क न वापरणे नियमांचे उल्लंघन आणि मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन अशा विविध कारणांसाठी आयुक्तालयाने ३ लाख ३३ हजार २०० रुपये दंड केला आहे.सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ४५७ नागरिकांवर कारवाई करून २,३१,००० रुपयांचा दंड वसूल केला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११ आस्थापनांविरुद्ध २७,००० दंड केला. ३७५ व्यक्तींविरुद्ध मोटार वाहन कायदा मोडल्याबद्दल कारवाई करीत ७५,२०० रुपये दंड वसूल केल्याचे आयुक्तालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.