येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महानगरपालिका, परिवहन उपक्रमाच्या बसेस मधून शहर व ग्रामीण पोलीस, अधिकारी व कर्मचारी यांचे कर्तव्यार्थ मोफत पोलीस प्रवास दिला जातो. सन 2000 पासून ते 2021 पर्यंत पोलीस, अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणा-या मोफत प्रवासापोटी परिवहन उपक्रमास मिळणारे अनुदान थकीत होते, सदर हि रक्कम रुपये- 3,54,87,076/- (अक्षरी रक्कम रुपये – तीन कोटी चौपन्न लाख सत्याएेंशी हजार शहाहत्तर ) दिनांक 13/12/2022 रोजी सोलापूर महानगरपालिकेस प्राप्त झाली असून सदर रक्कम हि परिवहन उपक्रमाकडील 2007 पासून आजतागायत सेवानिवृत्त झालेले एकूण 510 सेवकांना हि रक्कत अदा करण्यात येणार असून, आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते परिवहन विभागाकडील 11 सेवकांना धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक विदया पोळ, परिवहन कार्यालय अधिक्षक श्री. मल्लिकार्जून पडगाणूर, श्री.गिरीष अंटद, तसेच परिवहन विभागकडील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. परिवहन विभागाकडील एकुण 404 इतक्या कर्मचा-यांची पेंन्शन व उपदान रक्कम थकीत आहे. या सेवकांनी कोणतेही केसेस/दावे दाखल न केलेल्या कर्मया-यांची रक्कम प्राधान्याने देण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 60 कर्मचा-याच्या रक्कम 25000 च्या आत असल्याने पूर्ण देण्यात येतील. उर्वरित 340 सेवकांच्या एकूण रक्कमेपैकी 25000 पहिल्या टप्प्यात आणि येत्या 3 , 4 महिन्यामध्ये रक्कम टप्या – टप्याने अदा करणेचे नियोजन केलेले आहे. हि एकुण रक्कम 92,52,936/- इतकी आहे. प्रा.फंड ासाठी ग्राहक मंच व कामगार न्यायालयामधे एकुण 92 सेवकांनी दावा दाखल केले होते. सदर दाव्यामधील रक्कम 1,80,60,341/- होती ती रक्क्म पूर्णपणे देण्यात येणार आहे. मे.मोटार अपघात दावे न्यायाधिकरण (सिव्हिल कोर्ट सोलापूर) -29 दावेकरी असून त्याची देय रक्कम – 28,41,485/- त्या व्यतिरिक्त इतर न्यायालयात अपघात दाखल असणारे एकुण 29 केसेस होत्या त्यांची रक्कम मोठी असून, त्यापैकी 5 लाख रुपये देण्याचे नियोजन आहे.विविध न्यायालयातली दाव्यामध्ये व्याजाची रक्कम एकुण सहा लक्ष एकोणिस हजार इतकी आहे. मा.लोकायुक्त केसेस मधील देय रक्कम- 11,57,113/- इतकी आहे. अशी जवळपास एकुण रक्कम रु. 3,54,87,076/- पैकी र.रु 3,23,73,899/- (अक्षरी रक्कम रुपये – तीन कोटी तेवीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे नव्यान्नव ) इतकी रक्कम तात्काळ सेवकांना अदा करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित रक्कमेमध्ये पुढील नियोजन करुन ती देखील लवकरच सेवकांना देण्यात येणार आहे.