सोलापूर : जिल्ह्याचा १४ जून चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. रविवारी रात्री १२ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात नवीन २९९ रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या ३७५ आहे. जिल्ह्यात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता सर्व तालुक्यांमध्ये १०० पेक्षा कमी नवीन रुग्ण आढळले आहेत.