शासनाची राह-वीर योजना
सोलापूर दि.09(जिमाका): – केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तात्काळ मदत करणाऱ्या आणि अपघातग्रस्तांना अपघाताच्या गोल्डन अव्हरमध्ये हॉस्पिटल्स ट्रॉमा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस राह-वीर म्हणून पुरस्कार देण्याची घोषणा जाहीर केलेली आहे.
रस्त्यावरील मोटार अपघातातील अपघातग्रस्तांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्याकरिता सामान्य जनतेस प्रवृत्त करणे व निष्पाप जीव वाचविण्यासाठी इतरांना प्रेरणा देणे प्रेरित करण्याच्या उद्देशाने राह-वीर योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे राह-वीर यास 25000 रुपये इतकी पुरस्कार रक्कम रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने नवी दिल्ली यांनी निश्चीत केलेली आहे.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली असून. या योजनेबाबत रोजी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हास्तरीय समितीकडून निवडण्यात आलेल्या राह-वीर व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे. या समितीकडून मंजूर झालेले प्रस्ताव परिवहन आयुक्त, मुंबई यांचे कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी दिली आहे.