येस न्युज मराठी नेटवर्क : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २६६३ वाहनांची तपासणी करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्या ४८२ व्यक्तींना २,४१,००० ₹ दंड करण्यात आला . मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने ६७१ व्यक्तींना १,३९,७०० ₹ दंड करण्यात आला . ४ आस्थापनांविरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई करून ६,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सात पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आलेल्या या विशेष नाकाबंदी मोहिमेत एकूण ३,८६,७००₹ दंड वसूल करण्यात आला व २५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्याचे आयुक्तालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.