अपघातातील १५ वर्षाचा मृत मुलगा कोरोना पॉझिटिव्ह
सोलापूर : सोलापूर शहराचा covid-19 चा ११ जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. गुरुवारी रात्री बारा वाजता संपलेल्या चोवीस तासांत नवीन १७ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत २४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत . दोघांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. १० जून रोजी अपघातात मृत्युमुखी पडलेला उत्तर कसबा परिसरातील १५ वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पोस्टमार्टम मध्ये निष्पन्न झाले आहे.