चंद्रपूर : राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत 15 टक्के मंत्री करता येतात. त्यानुसार राज्यात एकूण 43 मंत्री करता येतात. यापैकी 20 मंत्री सध्या कार्यरत असून, आणखी 23 मंत्र्यांची निवड केली जाऊ शकते. यात भाजप-शिवसेनेच्या आमदारांना पुढील विस्तारत संधी मिळू शकते. हा विस्तार येत्या काही दिवसात लवकरच होऊ शकतो, असेही मुनगंटीवार म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
राज्य मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार लवकरच होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते. कारण सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत 15 टक्के मंत्री करता येतात. म्हणजेच एकूण 43 जणांचं मंत्रिमंडळ होऊ शकतं. सध्या 20 मंत्री राज्याचा कारभार पाहात आहेत. त्यामुळे आणखी 23 जणांना मंत्रिमंडळास स्थान मिळू शकते, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.