येस न्युज मराठी नेटवर्क । अयोध्येतील राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेने सुरू केलेल्या ४४ दिवसांच्या निधी संकलन मोहिमेत शनिवारी सायंकाळपर्यंत एकविसशे कोटी रुपये जमा झाले. 15 जानेवारी रोजी हे निधी संकलन सुरू करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषदेने एक हजार कोटी चे ध्येय ठेवले होते. मंदिर उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सांगितले की, इमारत उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक अद्याप तयार झालेले नाही. देशभरातील लाखो लोकांनी राममंदिरासाठी निधी दिल्याचे. निर्मोही आखाड्याचे प्रभात सिंह यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाचे माजी खासदार विनय कटियार यांनी सांगितले की, भगवान रामाच्या नावाने जमा झालेला निधी फक्त मंदिर उभारणीसाठीच वापरण्यात येईल.