नाशिक : 2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते. आता 1500 वर आलेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे सरकार पुन्हा येत नाही. आमचे सरकार येणार आहे. आम्ही लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आताच रक्कम वाढवून द्या, असे आव्हान युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, येथे जे मंत्री आहेत त्यांना कधी वाटले नाही का? जनतेला पाणी मिळावे. येथे अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खोके सरकार आपल्यावर बसवले आहे. मात्र, पुढचे सरकार आपण निवडणार आहोत. लोकसभेची मोठी लढाई आपण जिंकलो आहोत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांची मागणी छोटी आहे. दोन्ही परीक्षा एकाच वेळी हा हट्ट का? मागील वर्षीही तेच झाले होते. सत्ताधारी पक्ष, मंत्री या विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत, असे त्यांनी म्हटले.