सोलापूर : विश्वनाथ माणिक अँड सन्स या स्टेशनरी दुकानातून एव्हरेडी इंडस्ट्रीजचे सेल्स ऑफिसर महेश तावसकर याने साडेचार लाखांचा माल महेश निंबर्गीकर यांना द्यायला लावून या मालापोटी एक लाख 64 हजार रुपये टप्प्याटप्प्याने दिले.
मात्र उर्वरित दोन लाख 72 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केल्यामुळे नितीन बारड यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर धायगुडे अधिक तपास करीत आहेत.