सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत 334 उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरलेले होते दिनांक 4 नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत 150 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले असून 184 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील एकुण 11 विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची विधानसभा मतदार संघनिहाय संख्या.
- 244- करमाळा, एकुण उमेदवार 31, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 16, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 15,
- 245- माढा, एकुण उमेदवार 30, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 17, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 13,
- 246- बार्शी, एकुण उमेदवार 31, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 11, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 20,
- 247- मोहोळ (अ.जा), एकुण उमेदवार 27, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 17, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 10,
- 248- सोलापूर शहर उत्तर, एकुण उमेदवार 26, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 06, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 20,
- 249- सोलापूर शहर मध्य, एकुण उमेदवार 39, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 19, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 20,
- 250- अक्कलकोट, एकुण उमेदवार 15, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 03, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 12,
- 251- सोलापूर दक्षिण, एकुण उमेदवार 40, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 15, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 25,
- 252- पंढरपूर, एकुण उमेदवार 38, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 14, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 24,
- 253- सांगोला एकुण उमेदवार 32, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 19, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 13,
- 254- माळशिरस (अ.जा), एकुण उमेदवार 25, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 13, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 12, एकुण उमेदवार 334, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 150, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 184.