येस न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यातील covid-19 चा रविवारचा अहवाल प्राप्त झाला असून नव्याने १६६८ व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली आहे. रुग्णालयातून घरी परत गेलेल्या व्यक्तींची संख्या 24 तासातील १२५९ आहे. याच कालावधीत २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. मृतांमध्ये माढा तालुक्यातील चिंचगाव येथील 27 वर्षाची महिला, कुर्डूवाडी येथील 45 वर्षांची महिला, टाकळी येथील 43 वर्षाची व्यक्ती , सांगोला तालुक्यातील बलवडी येथील 55 वर्षांची महिला , पंढरपूर येथील गोविंद परा येथील 44 वर्षाची महिला , खर्डी येथील 50 वर्षांची व्यक्ती, लक्ष्मी टाकळी येथील 36 वर्षांची व्यक्ती, बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील 34 वर्षांची व्यक्ती ,बार्शीच्या जगदाळे मामा हौसिंग सोसायटीतील 47 वर्षाची महिला, उपळे दुमाला तील 46 वर्षांची व्यक्ती ,रस्तापूर येथील 32 वर्षांची व्यक्ती, माळशिरस तालुक्यातील यशवंत नगर येथील ४२वर्षांची व्यक्ती आदीं कमी वयाच्या व्यक्तींचा समावेश आहे. नव्याने कोरोनाची बाधा झालेल्या मध्ये माळशिरस तालुक्यात 346 , पंढरपूर तालुक्यात 372, मंगळवेढ्यात 269 करमाळा 161, माढा 140, बार्शी 132 अशा रुग्णांचा समावेश आहे.