मृतांमधे ४५ पेक्षा कमी वयाचे ७ जण
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे रविवारी प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये १६०२ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. याच काळामध्ये वीस जण मृत्युमुखी पडले. चिंतेची बाब म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या २० जणांपैकी १२ जण हे ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि या बारा जणांमध्ये सात व्यक्ती या ४५ पेक्षा कमी वयाच्या आहेत. कोरोना आता कमी वयातील लोकांना देखील घातक ठरत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. बार्शी, करमाळा मंगळवेढा आणि मोहोळ या चार तालुक्यात शंभरपेक्षा अधिक नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली माढा आणि माळशिरस तालुक्यात दोनशे पेक्षा अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली तर पंढरपूर तालुक्यात 300 पेक्षा अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.