१५७५ कोरोनामुक्त,२४ जणांचा मृत्यू
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्याचा covid-19 चा गुरुवार २० मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून १५६९ व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात रुग्णालयातून कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १५७५ आहे. या कालावधीत धोरणामुळे २४ जणांचा बळी गेला आहे. चोवीस मृतांमध्ये सर्वात कमी वयाची तरुणी पंढरपूर तालुक्यातील विटे विटे येथील २१ वर्षांची आहे या तरुणीला ३ मे रोजी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिचा १४ मे रोजी दुपारी तीन वाजता कोरोना मुळे मृत्यू झाला. कोरोना बाधितांच्या तालुकानिहाय आढावा घेतला असता सर्वाधिक रुग्ण पंढरपूर तालुक्यात ३५२ आहेत . माळशिरस तालुक्यात ३०२, माढा तालुक्यात २०८, सांगोला तालुक्यात १५७, मोहोळ तालुक्यात १०१, करमाळा तालुक्यात १२६, आणि बार्शी तालुक्यात १५५ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. २४ मृतांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील ८ आणि पंढरपूर तालुक्यातील ९ तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहा जणांचा समावेश आहे.