सोलापूर : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक-यांसाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२३-२४ अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेतून ६ कोटी २० लाख रूपये किंमतीच्या १५५ विहीरी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी दिली.
अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेचा लाभ तालुक्यातील गोरमाळे, उपळे दुमाला, तांबेवाडी, आगळगाव, घाणेगाव,तुर्कपिंपरी, कळंबवाडी, मुंगशी आर,मालवंडी, पुरी, उंबरगे, बाभुळगाव, बोरगाव खुर्द, पाथरी, उपळाई ठोंगे,मालेगाव आर, इंदापुर,साकत, गुळपोळी, सासुरे, श्रीपतपिंपरी, शेलगाव मा,मांडेगाव,खांडवी, पिंपळगाव धस, उंडेगाव, धोत्रे, ताडसौंदणे, पानगाव, देवगाव, आळजापुर, राळेरास, सर्जापुर, बाभुळगाव, तावडी, नारी, नारीवाडी, भातंबरे, ज्योतीबाची वाडी,कांदलगाव,बावी आ,वांगरवाडी, तावरवाडी,जामगाव आ,पांगरी,निंबळक,कोरेगाव,खडकोणी, मळेगाव,धामणगाव दु,रातंजन, कोरफळे, मानेगाव, रुई, काटेगाव, अरणगाव, सारोळे, सुर्डी, बावी, चिखर्डे, रऊळगाव, वाणेवाडी इत्यादी गावातील अल्पभूधारक शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे.