उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात १५१ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १२० पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून पर्यटकांना शोधण्यासाठी आणि महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली. ढगाळ वातावरणामुळे मोबाईल नेटवर्क आणि बॅटरी चार्जिंग नसल्याने त्यांचा संपर्क होत नाही, संपर्क झाल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याची ग्वाही बर्धन यांनी दिली.
महाराष्ट्र संपर्क क्रमांक –
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र संपर्क: 93215 87143/ 022-22027990/022-22794229, डॉ. भालचंद्र चव्हाण, संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र महाराष्ट्र -9404695356
उत्तराखंड राज्य आपत्कालीन कार्य केंद्र संपर्क 0135-2710334/8218867005, प्रशांत आर्य, जिल्हाधिकारी, उत्तरकाशी- मोबाईल क्रमांक: 9412077500/ 8477953500, मेहेरबान सिंग (भाप्रसे) (समन्वय अधिकारी)- 9412925666, मुक्ता मिश्रा, सहायक जिल्हाधिकारी, उत्तरकाशी- 7579474740, जय पनवार, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उत्तराखंड- 9456326641, सचिन कुरवे (भाप्रसे) (समन्वय अधिकारी) – 8445632319.