• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, February 16, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

१५ वर्षीय सोनाक्षी माडे सलग १२ तास दांडपट्टा फिरवून रचणार ‘विश्वविक्रम’

by Yes News Marathi
February 16, 2026
in इतर घडामोडी
0
१५ वर्षीय सोनाक्षी माडे सलग १२ तास दांडपट्टा फिरवून रचणार ‘विश्वविक्रम’
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्राची मर्दानी खेळ परंपरा जगभरात पोहोचवण्यासाठी सोलापूरची एक रणरागिणी सज्ज झाली आहे. स्वातंत्र्य सैनिक सिद्रामप्पा फुलारी प्रतिशान व रुद्रशक्ती गुरुकुल मर्दानी प्रशिक्षण केंद्र सोलापूर यांच्यातर्फे जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर, इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी सोनाक्षी मोहन माडे,वय १५ वर्षे ही येत्या १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘दांडपट्टा’ या साहसी शखाच्या जोरावर विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे.

विक्रमाचे स्वरूप आणि वेळ

शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत सोनाक्षी अत्यंत कठीण समजले जाणारे ‘पट्टाशख’ सलग १२ तास, १२ मिनिटे आणि १२ सेकंद फिरवणार आहे.

कठोर सराव आणि जिद्द

सोनाक्षी गेल्या अनेक महिन्यांपासून या विक्रमासाठी कठोर सराव करत आहे. अवघ्या १५ व्या वर्षी तिने दाखचलेले हे धाडस आणि शारीरिक क्षमता पाहून क्रीडा विश्वातून तिचे कौतुक होत आहे. संभाजीराव शिंदे विद्या मंदिर या प्रशालेचे नाव आता जागतिक स्तरावर गाजणार असून, सोलापूरकरांसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

“सोनाक्षीचा हा प्रयत्न केवळ वैयक्तिक विक्रमासाठी नसून, भारतीय युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी आहे. तिच्या या साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन रुद्रशक्ती गुरुकुल मर्दानी प्रशिक्षण केंद्र सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विश्व विक्रम दिवस
दिनांकः १९ फेब्रुवारी २०२६,वेळ: सकाळी ठीक ६:०० वाजता प्रारंभ ते सायंकाळी ६:१५ वाजता सांगता,स्थळः सुशिल रसिक हॉल, मुरारजी पेठ, सोलापूर.

Previous Post

सोलापुरात २ मार्चपासून एस. एल. गायकवाड यांचे चक्री उपोषण

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोलापूरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोलापूरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोलापूरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In