येस न्युज नेटवर्क : सोलापूरच्या मध्य रेल्वे विभागाकडून तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली यावेळी केवळ ८ तासात 2375 फुकट्या प्रवाशांकडून 15 लाख 70 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाने, धूम्रपान करणे अशी अनेक कृत्य केल्याबद्दल रेल्वेने 1227 प्रवाशांवर ही दंडात्मक कारवाई केली आहे त्यांच्याकडून सात लाख 52 हजार रुपये दंड वसूल केला आहे रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत ही मोहीम चालली असून एकूण 29 एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवाशांवर दंडात्मक कारवाई झाली आहे ही विशेष तिकीट तपासणी मोहीम रेल्वेची व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी तपासणी विभागाचे 92 कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बलाचे 21 जवान उपस्थित होते