पुणे : शरद पवार कुटुंबीयांचं गाव असलेल्या काटेवाडीत 14 दिवसांकरिता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुढील 14 दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं काटेवाडी गावामध्ये शंभर टक्के लॉकडाऊन पाळला जात आहे. दोन दिवसापूर्वी गावांमध्ये अँटीजन कॅम्प घेतला होता, या कॅम्पमध्ये 27 रुग्ण आढळून आले. त्यामुळं गावात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. आधी शहरांमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने आता गावखेड्यात धडक दिलीय. त्यामुळे तालुका आणि गाव पातळीवरील प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. बारामती तालुक्यात मागील दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यानं गेल्या महिन्यात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता जून महिन्यातही रुग्णसंख्येचा वेग कायम असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.