पाच तालुक्यात १०० पेक्षा कमी नवीन रुग्ण
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्याचा २२ मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये नवीन १३५५ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत रुग्णालयातून कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तींची संख्या २०३६ आहे . या २४ तासात २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे . मृतांपैकी दहा जण ५० पेक्षा कमी वयाचे आहेत. मोहोळ तालुक्यातील जामगाव येथील ४२ वर्षाची व्यक्ती , घोडेश्वर येथील ४३ वर्षाची महिला , सावळेश्वर येथील ३७ वर्षाची व्यक्ती आणि शिरापूर येथील ४७ वर्षाची व्यक्ती मृतांमध्ये समाविष्ट आहेत . माढा तालुक्यातील होले येथील ४६ वर्षांची व्यक्ती व चव्हाणवाडी येथील ४२ वर्षांची व्यक्ती मृतांमध्ये समाविष्ट आहे. पंढरपूर तालुक्यातील कवठाळी येथील ३७ वर्षांची व्यक्ती आणि उंबरगाव येथील २१ वर्षांची महिला तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथील ३२ वर्षाची व्यक्ती व वडकबाळ येथील २५ वर्षाची व्यक्ती मृतांमध्ये समाविष्ट आहेत. तालुकानिहाय कोरोना बाधितांचा आढावा घेतला असता बार्शीमध्ये १६४, करमाळा तालुक्यात २०३, माढा तालुक्यात २१३, माळशिरस तालुक्यात १६६, पंढरपूर तालुक्यात २२९ आणि सांगोला तालुक्यात १४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा , दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या पाच तालुक्यात शंभरपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत.