सोलापूर : महापालिकेचा कोवीड 19 चा ११ जुलैचा अहवाल प्राप्त झाला आहे. शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत सोलापूर शहरात नव्याने १३ जणांना लागण झाली आहे . ९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दोघांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे.
तर दुसरीकडे ग्रामीण भागात नव्याने २७८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत ४०४ कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत . तीघांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. तालुकानिहाय आढावा घेतला असता सर्वाधिक रुग्ण माळशिरस तालुक्यात ८२ आहेत. सांगोला तालुक्यात ५४ आणि पंढरपूर तालुक्यात नवीन ४२ रुग्ण आढळले आहेत. म्यूकरमायकोसिसचे आज नवीन चार रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू ओढवला आहे.