सोलापूर: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेडपी सीईओ कुलदीप जंगम यांनी १२७ महीला आरोग्य कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेला मंजूरी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून आरोग्य महिला कर्मचार्यांना अश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला नव्हता .
यातील काही महिला कर्मचारी सेवानिवृत्त होऊन देखील त्यांना लाभ मिळाला नाही. हि बाब लक्षात घेऊन सीईओ जंगम १२७ आरोग्य महिला कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ मंजूर केला.
त्यामुळे महिला कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी राखी पोर्णीमेची भेट दिली असल्याचे आरोग्य महिला कर्मचारी बोलत आहे, या महिलामध्ये लाभ मंजूर केल्याबद्दल सीईओ कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, यांचे सर्व आरोग्य महिला कर्मचारी यांनी आभार व्यक्त केलेले आहेत व आम्हाला अशा प्रकारे वेतनश्रेणी वेळेत मंजूर केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.