येस न्युज मराठी नेटवर्क : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील सोलापूर महानगरपालिकेच्या 120 रनिंग किमीच्या रस्त्यावरून यांत्रिकी पद्धतीने रस्ता साफसफाई करणे आणि कचरा उचलण्याचा कामचा संचलन समारोह आज सिद्धेश्वर मंदिर जवळ, रोड शिपिंग मशीनचे उद्घाटन प्रशासक तथा महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपायुक्त धनराज पांडे, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे,सफाई अधिक्षक एन. सी बिराजदार,मुख्य आरोग्य निरीक्षक अनवर शेख,आय.टी. बिराजदार,स्वप्नील सोलनकर,गिरीश तंबाके, तेजस शहा आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील दररोज एकूण 120 किमी रोड शिपिंग च्या माध्यमातून स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प लायन सर्व्हिसेस लिमिटेड (ग्लोबल एक्सलन्स ग्रुपची भारतभर एकात्मिक नगरपालिका सेवा आणि सुविधांचे व्यवस्थापन प्रदान करणारी आघाडीची कंपनी) यांच्याकडे देण्यात येणार आहे.त्यांना प्रति किमी 1150/- रुपये देण्यात येईल.या मशिनद्वारे रोडवरील तसेच दुभाजक मधील मातीसह कचरा उचलण्यात येणार आहे.शहरातील फुटपाथवरील सुद्धा स्वच्छता तसेच कचरा या मशिनद्वारे उचलण्यात येणार आहे.शहरातील मुख्य चौक या मशीनच्या द्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे.त्याच बरोबर शहरातील मोठे रस्ते व स्मार्ट सिटी ने तयार केलेल्या रस्त्यावरती या मशिनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. या मशीनमुळे सोलापूर शहरातील धुळीचे प्रमाण कमी होणार आहे.रोड शिपिंग कंपनी च्या माध्यमातून वेळोवेळी महापालिका च्या माध्यमातून आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना त्यांना देण्यात येईल अशी माहिती आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.
सोलापुरातील रस्त्यांची स्वच्छता अत्याधुनिक मशिन्सच्या सहाय्याने व्यवस्थापित केली जावी हे आपल्या सर्वांचे समान ध्येय आहे. भारतातील प्रमुख स्वच्छ शहराच्या ओळी अनेक वर्षांपासून स्वच्छता नियोजन क्षेत्रात काम करणारी कंपनी या नात्याने शहराची वायू प्रदूषणाची असुरक्षितता आम्हाला समजते. त्यामुळे सोलापुरात प्रथमच जागतिक दर्जाची रोड स्वीपिंग मशिन आणण्यात आली असून त्यांचा वापर करून पीएम १० आणि पीएम २.५ सारखी प्रदूषणाची पातळी कमी करता येईल.हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा ऑपरेशनल प्लॅनिंग असेल ज्यामध्ये सखोल सर्वेक्षण आणि रस्त्यांचे GIS मॅपिंग समाविष्ट असेल, LSL ची एक विशेष टीम या प्रणालीद्वारे देखरेख आणि देखरेख करण्यासाठी गुंतलेली असेल. दुसरा टप्पा हा प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आहे. ज्यामध्ये सुकाणू संघाचे ऑन-ग्राउंड प्रशिक्षण पर्यवेक्षक आणि अधिकारी यांना त्यांच्या कार्ये आणि जबाबदाऱ्यांसह दिले जाईल. LSL च्या SOP नुसार दैनंदिन/साप्ताहिक/मासिक/वार्षिक अहवाल स्वरूपाच्या आधारे निविदा आणि सर्व परिचालन क्रियाकलाप आणि प्रक्रियांची अंमलबजावणी अंतिम केली जाईल.अशी माहिती कंपनीचे हरदीप खोर यांनी दिली.