राज्यातील विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे. रामराजे नाईक निंबाळकरांना साताराच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवलं आहे. उद्या (शनिवारी) सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तुषार खरातांकडून मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप जयकुमार गोरेंनी केला होता. रामराजेंना समन्स पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलीस यांच्याकडून चौकशीसाठी समजपत्र पाठवण्यात आलं आहे. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर समन्स पाठवण्यात आलं आहे. उद्या सकाळी 11 वाजता वडूज पोलीस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात 12 लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवल्या आहेत. खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह पत्रकार आणि त्यांच्या संपर्कात असलेले काही कार्यकर्ते यांना नोटिसा बजावल्याची माहिती मिळत आहे.