योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांचे आवाहन.
सोलापूरकर करणारा एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग..
सोलापूर, दि २० जून :- केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर, योग दिवस समन्वय समिती आणि जिल्हा व पोलीस प्रशासन यांच्या वतीने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सकाळी ६.३० ते ७.४५ दरम्यान हरिभाई देवकरण प्रशालेचे क्रीडांगण येथे मुख्य जिल्हास्तरीय सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी दिली.

सदर योगाभ्यास ला शहरातील लोक प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहरातील सर्व नागरिक, क्रीडा व योगी प्रेमी, योग संस्था, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक ,विद्यार्थ्यानी, केंद्र व राज्य शासनाच्या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी बहुसंख्येने हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहावे. वाहन पार्किंगची व्यवस्था होम मैदान येथे करण्यात आली आहे. योग साधकांनी सोबत येताना पाण्याची बॉटल व चटई, मॅटस सोबत आणावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.