सहा तालुक्यात शंभरावर नवीन कोरोना रुग्ण
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असून गुरुवारी आलेल्या अहवालानुसार नव्याने ११७८ लोकांना कोरणा ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात १९ व्यक्तींचा जिल्ह्यात मृत्यू झाला. त्यापैकी १२ पुरुष आणि सात महिला आहेत. नवीन कोरोना बाधितांच्या संख्येचा विचार केला तर बार्शी ,करमाळा ,माढा, माळशिरस ,मोहोळ आणि पंढरपूर अशा सहा तालुक्यांमध्ये शंभरपेक्षा अधिक नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. बार्शी मध्ये 161, माळशिरस मध्ये 214, माढा तालुक्यात 157, पंढरपूरला 154 ,करमाळा 102 आणि मोहोळ 124 अशी नवीन करुणा बाधित रुग्णांची आकडेवारी आहे. मृत्यूमुखी पडलेल्या मध्ये माढा तालुक्यातील पाच मोहोळ मधील ४ ,बार्शी ३ आणि करमाळा तालुक्यातील ३असे कोरोनाबाधित मृत्युमुखी पडले आहेत.
लोकल डाऊन सुरू करून एक आठवडा उलटला तरी जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित यांची संख्या अजूनही हजारापेक्षा अधिक असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे . सोलापूर शहरातील तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांमधील बेड्स पूर्णपणे रुग्णांनी भरून गेले आहेत. सोलापुरात आता सिद्धेश्वर साखर कारखान्यातील मंगल कार्यालय, वाडिया हॉस्पिटल या ठिकाणी नवीन कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. आगामी आठवड्यात जर आणखी रुग्ण वाढले तर ही रुग्णालये तातडीने सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासन सध्या युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. सिद्धेश्वर साखर कारखाना मंगल कार्यालय आणि वाडिया रुग्णालय येथे बेड उपलब्ध करून दिले तरी त्या ठिकाणी ऑक्सीजन बेड्स आणि व्हेंटिलेटरची सोय कशी करायची हा खरा कळीचा मुद्दा आहे.