येस न्युज मराठी नेटवर्क ; मुळेगाव तांडा येथील एल. के . पी. सोसायटीतील एका घरातील पहिल्या मजल्यावर आयपीएल क्रिकेट मॅच वर सट्टा घेत असताना पाच जणांना चोकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील अकरा मोबाईल ,एक टीव्ही, एक लॅपटॉप , चार्जर , हिशोबाची नोंद वही , एक पेन ड्राइव्ह आणि दोन बॉल पेन असे साहित्य जप्त करण्यात आले आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सर्जेराव पाटील यांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींकडून माहिती घेतली असता सोलापूर येथील २ बुकिंच्या माध्यमातून सट्टा पुढे देत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार व पाच , भारतीय दंड विधान कलम 420, 109 ,336, 269 या कलमानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.