येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केलेल्या कारवाईत 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत दहा मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये जेलरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील विजापूर वेस येथील हत्तुरे फंक्शन हॉल , एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालय -कमटम नगर, तसेच गोंधळी वस्ती येथील, खासगी जागेतील विवाह सोहळा, तसेच जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अथर्व गार्डन मंगल कार्यालय, सात रस्ता परिसरातील उपलप मंगल कार्यालय, लोधी गल्ली येथे निघालेली विनापरवाना लग्नाची वरात , जाम गुंडी मंगल कार्यालय व जगदीश श्री लॉन, विजापूर रोड अशा दहा ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याशिवाय २७ रेस्टॉरंट १०६ मॉल्स दुकाने आणि शहरातील १६६५ लोकांवरबेकरी पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आली आहे.