सोलापूर : गुणवत्ता, संस्कार आणि सामाजिक भान असणाऱ्या मूकबधिर मुलांनी मला आपलेसे केले – असे प्रतिपादन सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक श्री शिरीषजी सरदेशपांडे यांनी केले.
राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयातील इयत्ता 10 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. प्रसन्न करणारे विद्यालयाचे वातावरण, तळमळीने शिकवणारे शिक्षक, आनंदी पालक आणि विद्यार्थी, असा हा सारा आनंदमेळाच आहे असेही ते म्हणाले.
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन अष्टगी यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि शाळेची माहिती मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी सांगितली. या प्रसंगी शाळेचे खजिनदार राजगोपालजी झंवर यांचे नातू आर्यन झंवर , रोटरी क्लबच्या जान्हवी माखिजा यांची कन्या युक्ता माखिजा आणि दीपक आहुजा यांची कन्या अवनी आहुजा यांनी देखील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेचे सचिव सुनील दावडा यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास रोटरी नॉर्थ चे अध्यक्ष मल्लिकार्जुन अष्टगी, शाळेचे सचिव सुनील दावडा , खजिनदार राजगोपालजी झंवर, जानवी माखीजा, श्रीकांत कांबळे, गंगाराम जोगदनकर, दीपक आहुजा, अमोल व्यवहारे, बळीराम पावडे, मुकेश मेहता, रेणुका पसपुलें, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, सैफन बागवान, चिदानंद बेनुरे, गंगाधर मदभावी, अजित पाटील, साहेबगौडा पाटील, बाबासाहेब पवार, आदी उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर आभार शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी मानले.