सोलापूर : हैदराबाद रोड वरील लाकडी व लोखंडी दरवाजे बनवण्याच्या कारखान्यातून १० जून रोजी सायंकाळी सहा ते ११ जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने १००० लोखंडी टावर बोल्ट असलेली बँग,१५० लोखंडी लाईट हँडड्राफ असलेली बॅग आणि लोखंडी मिडीयम आकाराचे १०० हॅण्डड्राफ असलेली बॅग असा जवळपास दहा हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला आहे. याप्रकरणी कारखान्याचे मालक रहीम इस्माईल सगरी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी हवालदार पवार अधिक तपास करीत आहेत.