येस न्युज मराठी नेटवर्क ; अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीनं देशभरात देणगी मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सध्या सुमारे १००० कोटी रुपयांचा निधी ट्रस्टकडे जमा झाला आहे, अशी माहिती ट्रस्टचे एक विश्वस्त आणि कर्नाटकातील उडुपी येथील पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली.विश्वस्त विश्वप्रसन्न महाराज म्हणाले, समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या प्रकल्पासाठी मदत दिली आहे. अयोध्येत मंदिर उभारायचं आणि त्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची एवढाच ट्रस्टचा उद्देश नाही. तर पुढे जात रामराज्य म्हणजे आदर्श कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्याचं या प्रकल्पाचं अंतिम उद्दीष्ट आहे.