येस न्युज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
यंदाच्या निकालात निकालात पुन्हा एकदा कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 9751 टक्के तर मुंबईचा निकाल 91.95 टक्के लागला आहे. यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली अग्रेसर आहेत. यावर्षी 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 91.60 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 3.84 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या लेकीला 100 टक्के
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या मुलीला बारावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले आहे. रेणुका बोरमणीकर असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. देवगिरी महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. तर राज्यातील 8782 मुलांना 90 टक्के गुण मिळाले, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.