सोलापूरमधील KLE स्कूलची 10 वर्षांची विद्यार्थिनी रीत अंकित धरमसी हिने मुंबई येथे पार पडलेल्या 62 व्या ‘Sunk Rock to Gateway of India Sea Swimming Race 2026’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे अरबी समुद्रात झालेल्या या प्रतिष्ठित जलतरण स्पर्धेत रीटने 10 ते 11 वर्षे वयोगटात 2 किमी अंतराच्या समुद्र जलतरण स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
ही स्पर्धा ‘Sunk Rock Light House’ येथून सुरू होऊन Gateway of India येथे समाप्त झाली. खवळलेल्या Arabian Sea मध्ये 2 किमीचे आव्हान पूर्ण करत रीटने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले.
62 वी ही ऐतिहासिक व मानाची समुद्र जलतरण स्पर्धा Maharashtra State Amateur Aquatic Association यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून आणि देशभरातून आलेल्या जलतरणपटूंमध्ये रीटने चमकदार कामगिरी करत सोलापूरच्या नावाला गौरव प्राप्त करून दिला.
रीत ही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळे आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच हे यश मिळाल्याचे सांगितले जात आहे.
रीतच्या या यशाबद्दल सोलापूर शहरात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही ती यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


