आसाम-देशात HMPV व्हायरसची प्रकरणं सतत नोंदवली जात आहेत. याच दरम्यान, आसाममध्येही एक प्रकरण समोर आले आहे. लखीमपूरमध्ये, एका १० महिन्यांच्या मुलाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. सध्या मुलाला दिब्रुगडमधील आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, मुलाची प्रकृती स्थिर आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही नाही.
आसाममधील या प्रकरणासह, देशात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) प्रकरणांची एकूण संख्या १५ वर पोहोचली आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक ४ प्रकरणे आहेत. शुक्रवारी राजस्थान आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. यापूर्वी गुरुवारी ३ प्रकरणे नोंदवली गेली होती. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.