अक्कलकोट तालुक्यात ऑनलाईन भामट्यांनी बँक ऑफ इंडिया च्या नावाने बनावट एपीके ॲप पाठवून 10 नागरिकांना जवळपास दहा लाखाहून अधिक रकमांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 8 जानेवारीपासून लिंक पाठवून पैसे गायब करण्याचे प्रकार सुरू होते. या कालावधीत अनेक नागरिकांच्या मोबाईलवर बँक ऑफ इंडिया नावाचा सही शिक्का असलेली बनावट फाईल पाठवण्यात आली. ज्यांनी ही फाईल ओपन केली त्यांचे खाते रिकामी झाले. एकाच दिवशी 9 जणांचे 10 लाख रुपये खात्यातून लंपास झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काहींनी वेळीच 1930 सायबर क्राईम हेल्पलाइनवर तक्रार केल्याने रक्कम होल्ड झाली.

