येस न्युज मराठी नेटवर्क : राजमाता विजयाराजे शिंदे यांना केंद्र सरकार अनोख्या पद्धतीनं अभिवादन करणार आहे. विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १०० रुपयांच्या नाण्याचं अनावरण करण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नाण्याचं अनावरण करणार आहेत.
प्रधानमंत्री मोदी या नाण्याचं अनावरण करणार आहेत. शिंदे राजघराण्यातील सदस्याच्या सन्मानार्थ नाण्याचं अनावरण होणार असल्याच्या घोषणेनंतर राजमाताच्या मुलीनं ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. १०० रुपयांचं हे नाणं चार धातूंपासून तयार करण्यात आलं आहे. या नाण्याच वजन ३५ ग्रॅम आहे. या नाण्यामध्ये चांदीचा वापर ५० टक्के करण्यात आला आहे. तर इतर धातूचं प्रमाण ५० टक्के आहे.