सोलापूर : स्व.राजेश कोठे युवा मंच आयोजित जागतिक महिला दिन सन्मान सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शुभांगी बुवा यांच्या शुभहस्ते महापौर श्रीकांचना यन्नम,अनुसया माने,शिक्षणाधिकारी सुलभा वठारे,शोभा नर्सिंग होमचे प्रतिभा पाटील,दि मेरी बी होर्डिंग कॉलेजचे प्राचार्य रूपश्री येवलेकर,स्मिता ओक आदीचा शाल, श्रीपळ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेविका मंदाकिनी पवार,मोनिका कोठे, राधिका कोठे, धनश्री कोंड्याला, सुलक्षणा पोन्नम आदी मान्यवर उपस्थित होते.