सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी दि. 21 सप्टेंबर 2020 रोजी उमेदपूर सेटलमेंट वसाहत येथील रहिवाश्यांच्या प्रॉपर्टी कार्ड मिळण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्याकडे शिष्ट मंडळासमवेत बैठक आयोजित केली होती.
यामध्ये उमेदपूर सेटलमेंट फ्री कॉलनी नं. 1 ते 6 ही वसाहत नागरी समुहात समाविष्ट असून गलीच्छ वस्ती सुधार वसाहतमध्ये समाविष्ट आहे. सदर कॉलनीमध्ये राहणारे रहिवासी गेल्या 60 ते 70 वर्षापासून राहत आहेत. या वसाहतीसाठी जमीन क्रिमीनल ट्राईबसाठी राखीव असलेल्या जमीनीपौकी काही जमीन ब्रिटीश प्रशासनाने या जमातीच्या सदस्यांचे पूर्नवसन म्हणून मोफत जागा 60/70 वर्षपासून दिली आहे. सदर रहिवाश्यांना वीज बिल, महानगरपालिकेची कर आकारणीचे पत्र आहे, परंतू मालकी हक्काचा प्रॉपर्टी कार्ड अद्यापपर्यंत नाही. यामुळे त्यांना अनेक अडचणी येत आहेत. याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना निदर्शनास आणून दिले.
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून उमेदपूर सेटलमेंट वसाहत येथ दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी अधिकारयासमवेत व्हिजीट घेतली व त्यांचे अडचणी जाणून घेतली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड बाबतचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रांत अधिकारी श्री. निकम, तहसिलदार श्रीकांत पाटील, सोमपा अधिकारी चलवादी, समाज कल्याण अधिकारी आडे, संबंधित तलाटी कांबळे, नगर भूमापन अधिकारी, सर्कल अधिकारी झेंगाणे, इतर संबंधित विभागाचे अधिकारी व तसेच सदर भागातील रहिवाशी गोपाळ नंदूरकर, नागेश गायकवाड (गवळी), भारत जाधव, विष्णु जाधव, सुरज गायकवाड, विष्णू गायकवाड, विजय जाधव, प्रकाश जाधव, अभिजित गायकवाड, शौलेश जाधव, ज्ञानदिप जाधव, धनराज गायकवाड आदि. बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.