सोलापूर : सोलापूर शहरात दिवसभर २१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात ८३८ मोटारसायकल चालकावर आणि पोलिसांचा आदेश भंग केल्यामुळे २६४ जणांवर म्हणजे सुमारे १२०० हून अधिक लोकांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवरती जागोजागी पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. नाकाबंदी, पेट्रोलिंग पथक फिरत आहेत. सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रांमध्ये २१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात शहरात विनाकारण फिरणाऱ्या ८३८ मोटारसायकल चालक तर पोलिसांचा आदेश भंग केल्यामुळे २६४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.