सोलापूर : सोलापूर शहरात उद्यापासून लॉकडाऊन लागणार अशी अफवा आणि चर्चा काल पासून आज दुपारपर्यंत जोरदार सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील लॉकडाऊन लागणार नाही असे जाहीर केले आहे तर महापालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी देखील सोलापूर शहरात आम्ही लॉकडाऊन लावण्याचा कोणताही प्रस्ताव ठेवला नाही अशी माहिती yes news मराठी’शी बोलताना दिली